|| श्री सखाराम महाराज वाडी मंदीर ||

सखाराम महाराज आपल्या चुलतबंधूंच्या घरातून विभक्त होऊन बाहेर यानंतर त्यांनी बोरी नदीच्या काठी एक झोपडी बांधली व त्यात राह लागले परच्यावारीला जाताना ती झोपडी ते नष्ट करुन टाकीत असत. पढे श्रीमंत वे यांच्या प्रेरणेने अंमळनेरच्या देशमुख मंडळींनी त्या झोपडीच्या जागेत एक मंदीर बांधले. त्या ठिकाणी पूर्वी 'खरबूजांचीवाडी' होती. त्यामुळे ते मंदीर वाडी' या नावाने ओळखले जाऊ लागले. आजहि तेच नाव प्रचलित आहे. अंमळनेरला वाडी चौक प्रसिद्ध आहे. त्या चौकात गेल्यावर पूर्वदिशेला वाडी मंदीर आहे. या मंदीराचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याला शिखर नाही. पश्चिमाभिमुख असलेल्या रस्त्यावरील दरवाज्यातून चार पाच पाय-या उतरुन आत गेल्यावर एक चौक लागतो. त्याला दगडीचौक म्हणतात. अलिकडे या चौकातील सर्व भितींवर विविध देवदेवतांची चित्रे रंगवून घेतलेली आहेत. त्या चौकातून उत्तराभिमुख द्वारातून आत गेल्यावर एक सभामंडप लागतो. तो खूप उंच आहे. त्याच्या दोन्ही बाजूला भक्तांना बसण्यासाठी जागा असून या सभा मंडपात भजन, कीर्तनादि कार्यक्रमासाठी विस्तृत जागा आहे. सभागृहाच्या पश्चिमेला देवाचा गाभारा आहे. त्यात प्रथम नक्षीदार खांबांना लाठी टाकलेली आहे व थोडी जागा मोकळी सोडून मग देवघर उभारलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस जाळीदार नक्षीच्या लाकडी भिती असून समोरच्या बाजूस उत्तम नक्षीकाम असलेले जाळीदार तीन कमानी दरवाजे आहेत. मागील बाजूस दगडी बांधकाम आहे.


देवघरामध्ये पायरयांचे तीन टप्पे आहेत. त्यावर अनेक देव देवता आहेत. सर्वात वरच्या बाजूस एक खास कमान उभारली असून त्यात श्रीविठ्ठल-राही- रुखमाई-गरुड-हनुमंत असे सहसा कुठे न पहावयास मिळणारे विठ्ठल पंचायतन यथ उभे केले आहे. या मूर्ति पुणे येथे लोखंडे या भाविकाने दिल्या व तेथून अमळनेरला आणल्या या मूर्तीच्या स्थापनेच्यावेळी श्रीसखाराम महाराजांनी जो रथोत्सव सुरु केला तोच पुढे त्यांच्या वैकुंठगमनानंतर "श्रीसखाराम महाराज यात्रोत्सव” या नावाने आजतागायत साजरा केला जातो.


वरील विठ्ठल पंचायतनाखेरीज ज्या अनेक मूर्ति आहेत त्यात एक अतिशय महत्वाची मूर्ति आहे ती म्हणजे "श्री लालजी'ची. श्रीसखाराम महाराज यांचा चाळिसगाव येथे एकदा मुक्काम असताना तेथील एका श्रीमंत महिलेने तिच्या घरी कीर्तन करण्यासाठी येण्याचे निमंत्रण केले. तिच्या घरी कीर्तन असताना महाराज नृत्य करु लागले.

त्यावेळी त्या बाईंच्या देवघरातील लालजींची मूर्ति त्यांच्या बरोबर नृत्य करु लागली. आपल्या भक्ताची भावावस्था श्रीलालजींना आवडल्याने त्यांनी श्रीमहाराजांकडे राहायचे ठरवले असावे कारण, श्रीलालजी त्या बाईच्या स्वप्नात गेले व मला महाराजांना अर्पण कर असे सांगितले. त्याप्रमाणे त्या बाईंनी ती मूर्ति महाराजांना अर्पण केली. श्रीलालजीच्या मूर्तिचा डावा हात डाव्याखांद्याजवळ आहे व उजवा हात उजव्या बाजूस कंबरेजवळ आहे. एक पाय पुढे व एक मागे असा नृत्याचा भाव असलेली अत्यंत रेखीव अशी पंचधातूचीहि मूर्ति आहे. अमळनेर येथे साजरा होणा-या उत्सवातील हीच उत्सवमूर्ति आहे. यात्रेच्या वेळी रथात व पालखीत तसेच दुस-याच्या दिवशी निघणारया सीमोल्लंघनाच्या पालखीत हीच मूर्ति विराजमान होते. अशावेळी भरजरी पोषाख व विविध प्रकारांचे सुवर्णालंकार घालून नटलेली ही मूर्ति पहाण्यासाठी भाविक विलक्षण गर्दी न करतील तरच नवल ! मंदीरातील लाठीच्या आत काही समाध्या व श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्ति आहे.


देवाला प्रदक्षिणा घालण्यासाठी आपण निघालो म्हणजे प्रथम एक समाधी लागते. ती श्रीसखाराम महाराज यांच्या गुरुंच्या गुरुबंधूची, श्रीलक्ष्मीकांत महाराज याची आहे. तिथून पुढे गेल्यावर आपल्या डाव्या हाताला एक खोली लागते. त्या खोलीला चित्राची खोली असे म्हणतात. श्रीसखाराम महाराज यांची झोपडी ज्या जागेवर होती त्याच ठिकाणी ही खोली आहे. विविध चित्रांनी रंगवलेल्या या खोलीत एक दगडी रथ आहे व त्यात श्रीसखाराम महाराज यांच्या पादुका आहेत. शिवाय या खोलीत अजुनहि श्रीसखाराम महाराज रात्री साठी विश्राताला येतात ही पूर्वापार चालत आलेली भावना असल्यामुळे शेजारती ने बिछाना घालून ठेवतात. पुढे निनिराळया महाराजांच्या काळात या वाडी मंदीराचा खूप विस्तार झाला गणेश मंदिर, हनुमान मंदीर, स्वयंपाकगृह, भोजनगृह, पागा, कोठीघरे, धर्मशाळा, गंगामाई मंदीर अशा अनेक इमारती वाडीला जोडून बांधल्या गेल्या आहेत. याखेरीज अमळनेर येथील देवस्थानच्या असलेल्या इतर इमारती पंढरपूर, पैठण, आळंदी येथे असलेले मठ, देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या अनेक जमिनी या सर्वांचे मिळून एक श्रीविठ्ठलरखुमाई संस्थान निर्माण झाले.

  


नित्य व नैमित्तिक पूजाअर्चा


पुढील येणारे कार्यक्रम